मुंबई | कंगना रनौतला दिलेला “पद्मश्री” तात्काळ परत घ्या. आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रकडे केली आहे. कंगनानं केल्या वक्तव्यामुळे लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. यामुळे केंद्र सरकारने तात्काळ पद्यश्री परत घ्या. आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असेही मलिक म्हणाले.
पुण्यात ईडीने वक्फ बोर्डाच्या जमिनीवर टाकलेल्या छाप्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आज (१२ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. तेव्हा मलिकांनी कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्त्यव्यावर स्पष्ट शब्दात टीका केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मलिकांच्या आधीच पत्रकार परिषद घेऊन कंगनाच्या वादग्रस्त व्यक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करत, पद्म पुरस्कार माघारी घेण्याची मागणी राऊतांनी यावेळी केली. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्याचंही राऊत म्हणालं.
कंगना नेमकं काय म्हणाली
“भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं,” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौत हिने केल आहे. कंगनानं एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत देताना बोलली. या वादग्रस्त विधानाचं तीव्र पडसाद देशभारत पडत आहेत.