HW News Marathi
महाराष्ट्र

आमोद्यात दहा मोरांचा मृत्यू, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा

नाशिक । नांदगांव तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात काल ( मे २८) दहा मोरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले , ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

आमोदे येथील विठ्ठल लाला पगार यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०० या क्षेत्राला लागून असलेल्या खाजगी व ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या परिसरात काही मोर मृत्युमुखी पडले असल्याचे शेतकरी दिपक पगार यांना दिसुन आले.ते शेत कामासाठी शेतात जात असताना त्यांच्या ही बाब निर्दशनास आली.

त्यांनी ही माहिती आमोदे गावातील पत्रकार महेंद्र पगार यांना दिल्यानंतर पगार यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली यावेळी जवळपास दहा मोर मृत्यू मुखी पडल्याचे आढळून आले.

वन विभागाचे आर एफ ओ चंद्रकांत कासार वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ , एन के राठोड ,आर के दौंड , वनपाल सुनील महाले,वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला, सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत. मृत्य झालेल्या मध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या मोरांचा शेवविच्छेदन करण्यासाठी नांदगांव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने निवडणुकीपूर्वीच आत्मविश्वास गमावला, उमेदवारीच्या गोंधळावरून मुंडेंचा विरोधकांना टोला

News Desk

‘जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच, भाजपने हा शब्द चोरला’, विनायक राऊतांचा राणेंवर घणाघात!

News Desk

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Adil