HW News Marathi
महाराष्ट्र

सोयीचे, पाहिजे तेच IAS, IPS अधिकारी नेमण्याचे ठाकरे सरकारचे धोरण – फडणवीस

मुंबई। राज्याच्या पोलिस विभागात काय सुरू आहे याबाबतचा प्रश्न साकीनाक्याच्या घटनेच्या निमित्ताने तसेच राज्यात सुरू असणाऱ्या गुन्ह्यांच्या निमित्ताने पडतो. नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत आयएसएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपल्याला सोईची आणि पाहिजे तेच अधिकारी आम्ही आणू, अशी सरकारची मानसिकता आहे. त्यामुळेच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यात नाराजी असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहचतो

साकीनाक्यात घडलेला बलात्काराचा प्रकार हा मन सुन्न करणारा असा आहे. मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे. गेल्या महिन्याभरात झालेल्या बलात्काराच्या घटना होताहेत त्याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. अमरावतीत १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पालघर, रत्नागिरी आणि पुण्यातही अशा घटना घडल्या आहेत. मुंबईला अतिशय सुरक्षित शहर म्हणून पाहिले जाते. महिलांना फिरण्याकरिता कोणतीही अडचण येत नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्यास मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहचतो. साकीनाक्याची घटना ही निघृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे.

तसेच गुन्हेगार बेफान होतात अशीही टीका त्यांनी केली

महिला आयोगाबाबत अनेकवेळा न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत. सरकारने अनेकवेळा आश्वासन दिले आहे. पण सरकारला फुरसत नाही, की ते महिला आयोगाला अध्यक्ष देतील, असेही फडणवीस म्हणाले. इतक्या सातत्याने महिलांवर अत्याचाराच्या घटना घडण हे महाराष्ट्राला शोभणार नाहीए. अशा घटना वारंवार घडत गेल्या तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलिसांमध्येही काही प्रमाणात नाराजी दिसली आहे. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काय परिस्थिती झाली त्याची सीबीआय चौकशी करत आहे. अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी या बदल्यांमध्ये सुरू असलेली नियमबाह्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला पाहिजे तेच अधिकारी आम्ही आणू, सोयीचे अधिकारी आणू, आमच्या व्यवहारांना संरक्षण देऊ अशी जर मानसिकता असेल तर गुन्हेगाराला संरक्षण मिळते. तसेच गुन्हेगार बेफान होतात अशीही टीका त्यांनी केली. बदल्यांच्या निमित्ताने निश्चितच नाराजी आहे.

अनेक स्टेट केडरमधील ज्युनिअर लोक महत्वाच्या ठिकाणी आणले जात असल्याबाबतची आयएएस अधिकाऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच अनेक ठिकाणी राज्यनिहाय आयएएस प्रमाण राखले जात नसल्याबाबतही नाराजी आहे. काही अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांना बाजूला केल्यासाठीही नाराजी व्यक्त झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी आणि आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, सोमय्यांची मागणी

News Desk

राज्यातील ही अनैसर्गिक युती फार काळ टिकणार नाही !

News Desk

भाजपचं मुंबईत रेलभरो आंदोलन!

News Desk