Site icon HW News Marathi

“कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाने हानी”, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई । ‘ उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते  केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचे अपघाती निधन झाले आहे. सायरस मिस्त्री यांच्या कारला पालघरमधील चारोटी येथे अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कार ही अहमदाबादहून मुंबईच्या दिशने येत असताना त्याचा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांची कार डिव्हायडरला आदळून हा अपघत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

 

Exit mobile version