HW News Marathi
महाराष्ट्र

मशिदीवरील भोंगे लावण्यास परवानगी द्या, AISJU संघटनेचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई | मशिदीवरील भोंगे लावण्यास परवानगी द्या, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करू, अशी मागणी करणारे पत्र ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उल उलामा संघटनेनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना लिहिले आहे. मुंबईमधील सर्व पोलीस ठाण्यात ज्या ज्या मशिदीवर भोग्यांची परवानगी मागितील आहे. त्या मशिदींना परवागी देण्याच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्तांना पत्रातून केली आहे. 

दरम्यान, मशिदीचे ट्रस्टी परवानगीसाठी तात्काळ पोलिसांकडे अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. तसेच “देशातील सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर मला वाटते की लाऊडस्पिकर वाटत असेल, तर त्यांना जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल (१७ एप्रिल ) झालेल्या पत्रकार परिषदेत बोललेत.

महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा, माणुसकी म्हणून मुस्लिम धर्मियांनी विचार करावा, प्रार्थनेला विरोध नाही. १ मे रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आणि जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार

News Desk

कर्जमाफीच्या फसव्या घोषणेविरोधात काँग्रेसचा एल्गार

News Desk

प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीने पत्रकातून दिले स्पष्टीकरण

Aprna