HW News Marathi
महाराष्ट्र

विनायक मेटे अनंतात विलीन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

बीड | शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) आज अनंतात विलीन झाले आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर आज (15 ऑगस्ट) बीड येथील राजेगाव या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.  विनायक मेटेंच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली होती.

विनायक मेटेंचा काल अपघाती मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. विनायक मेटेंना जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी विनायक मेटेंना मृत घोषित केले. या अपघातात विनाटक मेटे आणि यांचा बॉडीगार्ड यांचा मृत्यू झाला असून गाडीचा चालक एकनाथ कमद बचावला आहे. तसेच हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विनायक मेटेंचे पार्थिव मुंबईहून बीड शहरात काल रात्री आणले. मेटेंचे पार्थिव बीड शहरामधील शिवसंग्राम कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

 

गाडीला असा झाला अपघात
विनायक मेटे हे  फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या गाडीने मुंबईकडे निघाले होते. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या लेनने जाणाऱ्या कार चालकाचा त्यांच्या कारवरची ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम रुग्णालयात कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे. व बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ एमजीएम रुग्णालय,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी आम्ही व PSI चव्हाण साहेब तसेच रसायनी पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरक्षक बालवडकर व स्टाफ तसेच भारतीय राखीव दलाचे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते. या अपघातानंतर ट्रक चालक हा फरार झाला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

 

संबंधित बातम्या

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात ?

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका युगाचा अस्त! बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..

News Desk

सोनिया गांधींकडून ‘महाशिवआघाडी’ला मिळाला हिरवा कंदील | सूत्र

News Desk