HW News Marathi
Covid-19

#Lockdown5 : देशात कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई | केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. हा देशातील पाचव्या टप्प्यातीत लॉकडाऊनची आज (३० मे) जाहीर करण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. देशभरात रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. दरम्यान, ८ जनूनंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तसेच राज्यांशी चर्चा करून जुलै महिन्यामध्ये शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था शाळांबाबत निर्णय घेणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्र सरकार लॉकडाऊन शिथीलता देण्यात आली. येत्या १ जूनपासून ३० जूनपर्यंत या नियमावली जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सला अनलॉक १.० असे नाव देण्यात आले आहे. या नियमावलीनुसार, प्रत्येकाला मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे.

देशात लॉकडाऊन असा वाढवला कालावधी

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, तरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे ला संपणार होता. लॉकडाऊन ४ मे पासून १७ मेपर्यंत राहणार आहे. यानतंर आज देशभरात ३१ मेपर्यंत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीतील ‘हे’ महत्वाचे मुद्दे

News Desk

मोदी सरकारचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर, ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी देण्याचे केले आवाहन

News Desk

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांना प्रत्येकी १० लाख !

News Desk