HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांनी कोणताही मतदारसंघ निवडावा व निवडून दाखवावे”; नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

मुंबई | “मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जावून निवडणूक लढवावी. त्यानी कोणाताही मतदारसंघ निवडावा आणि तिथे मी त्यांच्याविरोधात उभी राहीन. नारी शक्ती काय आहे ते त्यांना दाखवून देईन,” असे थेट आव्हान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. नवनीत राणांना आज (८ मे) लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.  तब्बल १२ दिवसांनंतर राणा दाम्पत्यांना तरुंगातून बाहेर आले आहेत. नवनीत राणा भायखळा आणि रवी राणा तळोजाच्या तरुंगातून सुटका झाली असून नवनीत राणांना स्पाँडिलायसिसचा आजार असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जावून निवडणूक लढवावी. त्यानी कोणाताही मतदारसंघ निवडावा आणि तिथे मी त्यांच्याविरोधात उभी राहीन. नारी शक्ती काय आहे ते त्यांना दाखवून देईन. मग, तेव्हा आपण प्रामाणिकपणा आणि मेहनतीसमोर कोण निवडून येते ते कळेल. जर दम असेल तुम्ही तुमच्या पुरवजांच्या नावाने तुम्हाला आज मुख्यमंत्री पद मिळाले. पण, तुम्ही जनतेसमोर येवून तुम्ही लढवून दाखवा. तुमच्या समोर महिला ताकदीने कशी उभी राहते. हे मी त्यांना दाखवून देते. आणि येत्या काळात मी त्यांना चेतावणी देते की त्यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांच्यासमोर एक महिला निवडणूक लढवून दाखवते. महाराष्ट्रची जनता ज्या पद्धतीने राम आणि हनुमान चालिसाच्या नावावर त्यांनी माझ्यावर अत्याचार केले आहेत. माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर महाराष्ट्राची जनता देईल. 

रामाचे आणि हनुमानचे नाव घेऊन मी कोणतीच चुक केली. मुख्यमंत्र्यांना वाटते हे जर चूक असेल म्हणून त्यांनी मला १४ दिवास त्यांनी मला तुरुंगात ठेवले. मी त्यांना सांगू इच्छिते, जर देवाचे, श्री राम आणि हनुमानाचे नाव घेणे किंवा त्यांचे पठण करणे चुकीचे असेल. तर मला १४ दिवस मला थांबू शकत नाही. १४ वर्षही मला तरुंगात टाकले तरी मी तयार आहे.   मी तेवढ्याच ताकतीने उभी राहीन, मला कोणी दाबण्याचा प्रयत्न करू नये.    

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामसेवकावर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी

News Desk

शरद पवार सत्तेत असताना आरक्षणांच्या मुद्यावर कधीच भाष्य केले नाही

News Desk

चित्रा वाघ म्हणतात रावणाला मदत करणारी शुर्पणखा, आता चाकणकरांकडून उत्तर!

News Desk