HW News Marathi
महाराष्ट्र

गायीच्या दुधात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ

पुणे | गायीच्या दूध दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत काल (४ जून) घेतला आला. ही दरवाढ ८ जूनपासून लागू होणार आहे. दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. बैठकीत गायीच्या दुधाचा दर ४२ रुपयांवरून ४४ रुपये झाल्याने निर्णय घेतला आहे.

या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असून या दूध संघाचे राज्यभरात ११० सदस्य उपस्थित होते. गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे. पाठोपाठ जिल्हा दूध उत्पादक संघ आणि उर्वरित खासगी व्यावसायिकांनी भाववाढीचा निर्णय घेतला. म्हशीच्या दुधाचे दर कायम राहणार आहेत.

गोकुळ, वारणा, मदर डेअरी या दूध संघांनी आधीच १ जून पासूनच गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपये दरवाढ केली आहे. त्यामुळे या संघाकडून पुन्हा दरवाढ होणार नाही. परंतु, ज्या दूध उत्पादक संघांनी १ जून रोजी दरवाढ केली नव्हती. त्यांच्याकडून २ रुपये दरवाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादनाचा खर्च परवडत नसल्याने दर वाढ करण्याची मागणी दूध उत्पादक संघांकडून करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा! – अशोक चव्हाण  

Aprna

हे पहिले सरकार आहे जे सांगते की, आमचे राज्यपालांसोबत खुले युद्ध आहे – सुधीर मुनगंटीवार

News Desk

UP च्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा; राऊतांचा भाजपला टोला

Aprna