मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१६ मे) सांगितले.
राज्यात आज 1606 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 30706 अशी झाली आहे. आज नवीन 524 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7088 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 22479 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 16, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी २२ मृत्यू हे गेल्या २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४१, पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर सोलापूर शहरामध्ये १ मृत्यू झाला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या
- मुंबई : १८,५५५ (६९६)
- ठाणे: २०५ (३)
- ठाणे मनपा: १४१६ (१८)
- नवी मुंबई मनपा: १२८२ (१४)
- कल्याण डोंबिवली मनपा: ५०२ (६)
- उल्हासनगर मनपा: १००
- भिवंडी निजामपूर मनपा: ४६ (२)
- मीरा भाईंदर मनपा: २८३ (४)
- पालघर: ५० (२)
- वसई विरार मनपा: ३४० (११)
- रायगड: २१८ (२)
- पनवेल मनपा: १९६ (१०)
- *ठाणे मंडळ एकूण: २३,२०९ (७६८)*
- नाशिक: १०२
- नाशिक मनपा: ६६ (१)
- मालेगाव मनपा: ६६७ (३४)
- अहमदनगर: ५६ (३)
- अहमदनगर मनपा: १६
- धुळे: १० (३)
- धुळे मनपा: ६७ (५)
- जळगाव: १९३ (२६)
- जळगाव मनपा: ५७ (४)
- नंदूरबार: २२ (२)
- नाशिक मंडळ एकूण: १२५६ (७८)
- पुणे: १८९ (५)
- पुणे मनपा: ३३०२ (१७९)
- पिंपरी चिंचवड मनपा: १५६ (४)
- सोलापूर: ९ (१)
- सोलापूर मनपा: ३६२ (२१)
- सातारा: १३१ (२)
- पुणे मंडळ एकूण: ४१४९ (२१२)
- कोल्हापूर: २१ (१)
- कोल्हापूर मनपा: ६
- सांगली: ३८
- सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
- सिंधुदुर्ग: ७
- रत्नागिरी: ९१ (३)
- कोल्हापूर मंडळ एकूण: १७३ (५)
- औरंगाबाद:९७
- औरंगाबाद मनपा: ७७६ (२५)
- जालना: २१
- हिंगोली: ६६
- परभणी: ५ (१)
- परभणी मनपा: १
- औरंगाबाद मंडळ एकूण: ९६६ (२६)
- लातूर: ३३ (१)
- उस्मानाबाद: ७
- बीड: १
- नांदेड: ५
- नांदेड मनपा: ५४ (४)
- लातूर मंडळ एकूण: १०१ (५)
- अकोला: १९ (१)
- अकोला मनपा: २१७ (१३)
- अमरावती: ६ (२)
- अमरावती मनपा: ९६ (११)
- यवतमाळ: ९९
- बुलढाणा: २६ (१)
- वाशिम: ३
- अकोला मंडळ एकूण: ४६६ (२८)
- नागपूर: २
- नागपूर मनपा: ३५० (२)
- वर्धा: २ (१)
- भंडारा: १
- गोंदिया: १
- चंद्रपूर: १
- चंद्रपूर मनपा: ४
- नागपूर मंडळ एकूण: ३६१ (३)
- इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: ३० हजार ७०६ (११३५)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.