Site icon HW News Marathi

विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय; ज्ञानेश्वर म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

मुंबई | राज्यातील विधान परिषदेच्या (legislative council) शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांची मतमोजणी सुरू आहे.  हा पहिला निकाल कोकण शिक्षक मतदारसंघाचा (Konkan Teachers Constituency) पहिला निकाल हाती आला आहे. कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांचा विजय झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रेंनी महाविकास आघाडी  महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला.

भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जवळपास 20 हजार 648 मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना 9 हजार 768 ऐवढी मते मिळाली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा 16 हजार मतांनी विजयी झाले असून 3002 मते ही अवैध ठरली आहेत.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “माझा विजय हा शिक्षक, 33 संघटनांचा आहे. मला जी 20 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तो गरजेचा कोटा पहिल्या फेरीतच पूर्ण झाला आहे. मी आझाद मैदानात आंदोलन करून, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन अनुदानाचा प्रश्न सोडविला होता. आता पेंशनचा प्रश्न सोडवायचा आहे”, असे ते म्हणाले.

 

 

Exit mobile version