HW News Marathi
महाराष्ट्र

३ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले नाही तर…!

मुंबई | “३ तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविले नाही. तर तर जशास तसे उत्तर देऊ,” असा धमकी वजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरेंनी आज (१७ एप्रिल )  दोन महत्वाच्या घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी संभाजीनगरमध्ये जाहीरसभा घेणार असून ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहे, घोषणा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. 

राज ठाकरे म्हणाले, “येथे एका मुस्लिम पत्रकारांनी आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितले की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येते, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही देखील होतो. त्यामुळे भोंग्याचा त्रास फक्त हिंदुंना होत नाही तर मुस्लिमांनाही होतो. यामुळे भोंग्याचा सामाजिक आणि धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू. देशातल्या सर्व हिंदू बांधवांनी माझी विनंती आहे की, तुम्ही तयार रहा. आता रमजान सुरू आहे, म्हणून काही करायचे नाही. ३ तारखेपर्यंत भोंगे बंद झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ,” असे ते म्हणाले.

मशिदीवरील भोंगे हे अनधिकृत आहेत तर मग…आमच्या भोंगांवर कारवाई का करता, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, “देदेशातील सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर मला वाटते की लाऊड स्पिकर वाटत असेल, तर त्यांना जशास तसे उत्त देण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा, माणुसकी म्हणून मुस्लिम धर्मियांनी विचार करावा, प्रार्थनेला विरोध नाही. १ मे रोजी संभाजीनगरमध्ये सभा घेणार आणि जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची त्यांनी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला युतीत कोणीही नको”, चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं विधान

News Desk

डबल मास्क आणि फेस शिल्ड लावण्याचे पोलिसांना हेमंत नगराळेंचे आदेश

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

Aprna