HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला मोठा निर्णय

मुंबई | मुंबईची ओळख असणाऱ्या लागबागचा राजा आणि मुंबईचा राजा या दोन्ही मानाचे गणपती मानले जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजाची २२ फुटांची मूर्ती रद्द करुन ३ फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये दोन दिवसांपूर्वी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती. कोरोनाच्या संकटामुळे मंडळाने हा निर्णय घेतला असून लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी दिली. तसेच स्थानिकांनी सोशल डिस्टन्स पाळून गणपती बाप्पाचे दर्शन देणार असून इतरांसाठी मंडळ ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करणार आहे, अशी माहितीही स्वप्निल परब यांनी दिली.

गणेश गल्लीतील बाप्पाची मूर्ती ही मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्तींपैकी एक असते. याशिवाय, भव्यदिव्य देखावे आणि सजावटीमुळे हा गणपती पाहण्यासाठी लोक मोठ्याप्रमाणावर गर्दी करतात. मुंबईचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे भाविकांना या सगळ्याला मुकावे लागणार आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्हाला माझ्या लग्नाची एवढी चिंता का?” आदित्य ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावले

News Desk

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १४,८२१ कोरोना रुग्णांची नोंद, ४४५ जणांचा मृत्यू

News Desk

राज्यात आज १५,५७५ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk