HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

मुंबई | एमपीएससीचा (MPSC) नवीन अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्वीट हँडलवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीटमध्ये म्हणाले, “राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.”

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारीपासून (20 फेब्रुवारी) पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात सुरू होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात राज्यात तिसरे आंदोलन होते. यापूर्वी जानेवारीच्या अखेरीस एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य करत नवीन परीक्षा अंमलबजावणी पुढे ढकलली होती. परंतु, यासंदर्भात सरकारने निर्णय घेऊन एक महिना होऊनही निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा एमपीएससीचे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्त भागात परिस्थिती निवळेपर्यंत ग्राहकांना वीज बील पाठवू नका – नितीन राऊत

News Desk

पुण्याच्या पाटील इस्टेट झोपडपट्टीला भीषण आग

News Desk

मुख्यमंत्री आता पुन्हा राज्य कसे काय गहाण टाकणार ? | अशोक चव्हाण

Gauri Tilekar