Site icon HW News Marathi

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगडसह राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबई | राज्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यभरात परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तर हवामान खात्याने (Meteorological Department) मुंबईसह पुण्यात ऑरेंज अर्लट जाहीर केला असून  नाशिक जोरदार पाऊस पडत आहे. तर मुंबईतील ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये आज (16 सप्टेंबर) पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाने विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील घाटात सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबईतील पावसामुळे लोकल रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, रेल्व वाहतूक धम्या गतीने सुरू आहे.

तसेच नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला असून रामकुंडमध्ये अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहे. तर प्रशासनाने गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केले आहे. तर पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीतील पात्रात विसर्ग वाढवून सकाळी 9 वाजता 15 हजार 211 क्यूसेक करण्यात आल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.

 

 

Exit mobile version