HW News Marathi
महाराष्ट्र

CSD बिपीन रावत यांचे पार्थिव पालम विमानतळावर पोहोचणार

नवी दिल्ली | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे पार्थिव आज दिल्लीत दाखल होणार आहे. रावत यांचे पार्थिव आज (९ डिसेंबर) संध्याकाळी ९ वाजता पालम विमानतळावर पोहोचणार आहे. रावत यांच्यासह इतर १२ जणांचे पार्थिव दिल्लीत आणणार आहे. रावत यांच्यावर उद्या (१० डिसेंबर) दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जावून आदरांजली वाहणार आहे.

भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये कोसळले होते. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या घटनास्थळावरून आज (९ डिसेंबर) हेलिकॉप्टरचा ब्लॉक बॉक्स सापडला आहे. आणि फॉरेन्सिक पथकाने हा ब्लॉक बॉक्स ताब्यात घेतला आहे. या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले. रावत यांचे पार्थिव वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्याकडून मानवंदना देत आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादची निवडणुक हिंदुत्त्वाच्या मुद्दयावर लढणार !

swarit

सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

News Desk

बेस्टच्या २६ AC इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk