HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३६ वर

मुंबई। राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसाठी लॉकडाऊन झाले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३६ वर गेली तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० पार गेला आहे. राज्यात कालपासून (२६ मार्च) दिवसभरात २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर आज (२७ मार्च) सकाळी नागपूरमध्ये चार आणि गोंदियात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तचा आकडा वाढत असल्यामुळे भीती आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमधील पहिले तिन्ही रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. काल त्यांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यासाठी नमुने पाठवले होते. आज त्यांना डिस्चार्ज दिले जाईल. या तिन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे ११ मार्चला सिद्ध झाले होते. हे तिन्ही जणांनी पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यासोबत प्रवास केल्याने त्यांना कोरोनाचा लागण झाली होती.

“कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ट्विट करून दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३६ वर

मुंबई – ५१

पिंपरी-चिंचवड – १२

पुणे – २०

सांगली – ११

नवी मुंबई – ५

कल्याण – ५

नागपूर – ९

यवतमाळ – ४

अहमदनगर – ३

ठाणे – ५

सातारा – २

पनवेल – १

उल्हासनगर – १

औरंगाबाद – १

रत्नागिरी – १

वसई विरार – १

सिंधुदुर्ग – १

कोल्हापूर – २

गोंदिया – १

एकूण- १३६ कोरोनाग्रस्तांची संख्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या! – मुख्यमंत्री

Aprna

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

Aprna

गेल ऑम्वेट यांचं आज निधन!

News Desk