Site icon HW News Marathi

‘जांब समर्थ’ राम मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांना मोठे यश; 2 आरोपींना अटक तर मुख्य आरोपीचा शोध सुरू

मुंबई | जालना येथील समर्थ रामदासांचे (Samarth Ramdas) जन्मगावी ‘जांब समर्थ’तील राम मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. तर मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या मंदिरातून चोरांनी वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरी केल्याने राज्यभरात एकच खळबळ माजली होती.

या मंदिरातील श्रीरामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणासह अन्य सहा मूर्तीची चोरी झाली होती. या मंदिरातून ऑगस्ट महिन्यात पंचधातूचे राम पंचायतन यासह अन्य काही मूर्ती चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणाला दोन महिने उलटूनही मूर्तीचोरीचा छडा न लागल्याने येथील ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर संतापले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घनसावंगी पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. पोलिसांना चोरांचा तपास लागत नव्हता. यामुळे पोलिसांनी चोरांची माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या मूर्ती चोरीचा छडा लागत नसल्याने पोलीस महासंचालकाच्या सुचनेवरून एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

या ऐतिहासिक मुर्ती चोरी करणाऱ्या पोलिसांनी कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या चोरांनी 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती काही हजार रुपयांना विकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चोरीचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात एसआयटीद्वारे सुरू आहे. पोलीस महासंचालकांच्या सुचनेवरून एसआयटीची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल तपासासाठी महाराष्ट्रातील तामिळनाडू पोलिसांच्या एक्स्पर्ट आयडॉल विंगची मदत घेतली आहे.

 

संबंधित बातम्या

‘जांब समर्थ’ राम मंदिरातून समर्थ रामदासांनी स्थापित केलेली मूर्ती चोरीला

Exit mobile version