Site icon HW News Marathi

शरद पवार, गौतम अदानी बारामतीत ‘या’ उद्घाटन सोहळ्यासाठी हजर

मुंबई | राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन आज पार पडणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन होणार आहे.  या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे उपस्थितीतमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहेत. तसेच बारामतीमध्ये अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे.

दरम्यान, या सायन्स पार्कच्या उद्घाटना निमित्ताने दोन दिवसयी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोशन करण्यात आले होते. या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. मुलांना लहानपणीच त्यांचा वैज्ञानिक वृत्ती वाढीस लाणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली आहे.

या सायन्स पार्कचा भविष्यात विद्यार्थ्यांसाठी फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चरल गॅलरी, 3डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रीलिटी यासारखी तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहेत.

 

 

Exit mobile version