HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

दुसरी लाट संपलेली नाहीच, १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढतोय!

मुंबई। देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण आणि लसीकरणाबाबतचा आढावा देण्यासाठी आज आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. केंद्रीय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘गेल्या चार आठवड्यात देशातील १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना केसेस वेगाने वाढताना दिसत आहेत. देशातील ४७.५ टक्के केसेसची नोंद १८ जिल्ह्यात होत आहे. तसेच गेल्या आठवड्यामध्ये केरळच्या १० जिल्ह्यांमध्ये ४०.६ टक्के कोरोना केसेस आढळल्या आहेत. तसेच ४४ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये केरळ, मणिपूर, मिझोरमा आणि नागालँडचे जिल्हे आहेत.’

किती आहे रुग्णसंख्या

१००हून अधिक केसेसची नोंद झालेले २७९ जिल्हे १ जूनला होते. त्यात आता घट झाली असून ५७ जिल्हे झाले आहेत. १० मेला देशात ३७ लाख सक्रिय केसेस होत्या आता त्यामध्ये घट होऊन ४ लाख झाल्या आहेत. १ लाखांहून अधिक सक्रिय केसेस असलेले एक राज्य आहे, तर १० हजार ते १ लाख सक्रिय रुग्ण असलेले ८ राज्य आहेत. तसेच २७ राज्यांमध्ये १० हजारांहून कमी सक्रिय रुग्ण आहेत.’

आतापर्यंतचे लसीकरण

देशात एकूण ४७.८५ कोटी लसीकरण झाले आहे. ज्यामध्ये ३७.२६ कोटी लोकांनी पहिला डोस आणि १०.५९ कोटी लोकांना दुसरा डोस घेतला आहे. जगभरात मोठ्या संख्येने कोरोना केसेस समोर येत आहेत. महामारी अजूनही संपली नाही आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट देखील अजूनही आहे. दिवसा ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. सध्या आपल्याला कोरोना दुसऱ्या लाटेवर नियंत्रण करावे लागेल, असे अग्रवाल यांनी सांगितले.

Related posts

शहीद मेजर कौस्तुभ राणे पंचतत्वात विलीन

अपर्णा गोतपागर

हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश

News Desk

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

News Desk