Site icon HW News Marathi

राज्यातील 92 नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई | राज्यातील  92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांवर राज्य निवडणुकाने स्थगित केला आहेत. या निवडणुकीत राजकीय ओबीसी समाजाला आरक्षण लागू नाही. यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होय नये, अशी भूमिका राज्यातील सर्व नेत्यांनी घेतली होती.

दरम्यान,  याआधी 8 जुलै रोजी राज्य निवडणूकआयोगाने 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केले होते. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.   या याचिकेवर 12 जुलै रोजी सुनावणी पार पडली.  यावेळी निवडणूक आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 19 जुलैपर्यंत पुढे ढकलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत.

 

या जिल्ह्यातील निवडणूक स्थगित

अ वर्गातील ६ नगरपरिषदा- भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद, तर ब वर्गातील २८ नगरपरिषदा — मनमाड, सिन्नर, येवला, दौंडाईचा- वरवाडे, शिरपूर- वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ, अहमदपूर , अंजनगाव- सुर्जी. तर क वर्गातील नगरपरिषदा – कोल्हापूर- कुरुंदवाड, मुरगुड, वडगांव, औरंगाबाद- गंगापूर,नाशिक,  चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, जळगाव, वरणगांव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा,  यावल, अहमदनगर, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, पुणे, राजगुरु नगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, सातारा, म्हसवड, रहिमतपूर, वाई, सांगली, आष्टा, तासगाव, पलूस, सोलापूर, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, कोल्हापूर, गडहिंग्लज, कागल.

 

 

 

Exit mobile version