HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या ताफ्याला कोणी अडवणार हे इंटेलिजन्सला कळाले, पण पवारांच्या घरावरील हल्ल्याची कल्पना नव्हती?, राज ठाकरेंचा सवाल

मुंबई | “माझ्या ताफ्याला कोणीतरी अडवणार हे इंटेलिजन्सना कळाले, परंतु, शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांना हल्ला करणार हे इंटेलिजन्सला कळाले नाव्हते,” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी आज (१२ एप्रिल) ठाण्यात जाहीर सभा घेऊन महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवसस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी इंटेलिजन्सला एसटी कर्मचारी हल्ला करणार माहिती नव्हते, असे इंटेलिजन्सला माहित नव्हते, अशी माहिती समोर आली होती. या मुद्द्यांवर राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेतून तोफ टाकली. 

राज ठाकरे म्हणाले, “व्यासपीठावर येताना मला अनेक अग्निशमन दलाचा बंब दिसला. पण, मी इतकीपण आग लावणार नाही. मी आज दुपारी घरी बसलो असताना मला एका पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला. मला सांगितले की, साहेब तुम्ही किती वाजता निघणार आहात?,  ते आम्हाल सांगा. मी म्हटले का?, म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुमचा ताफा अडवणाऱ्यांना आम्ही ताब्यात घेऊ वगैरे. मी त्यांना म्हटले, मी निघेन तेव्हा तुम्हाला कळाले. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ताफ्याला कुणी तरी अडवणार आहे. हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळले. खरंतर इंटेलिजन्सला प्रत्येक गोष्ट माहिती असते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

Aprna

‘कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा

swarit

चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना, बोईंग ७३७ विमान कोसळले

Aprna