Site icon HW News Marathi

“… तर संपूर्ण देशात परिवर्तनाची लहर”; नाना पटोलेंची भविष्यवाणी

मुंबई | “राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) शेगावच्या यात्रे नंतर फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात परिवर्तनाची लहर दिसून येईल” असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. काँग्रेसच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेचा देशात 71 वा दिवस तर महाराष्ट्रात आज (17 नोव्हेंबर) 11 वा दिवस आहे. भारत जोडो यात्रा  कन्याकुमारी ते काश्मीर असा ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास असणार आहे.  ही पदयात्रा शेगावमध्ये शुक्रवारी  (१८ नोव्हेंबर) पोहोचणार आहे. यानंतर काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेस काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात एक मोठी परिवर्तनाची लहर आली आहे आणि त्यामुळेच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून लवकरच महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात परिवर्तन घडणार असल्याचंही ते म्हणाले. पुढे बोलताना पटोले  म्हणाले, राहुल गांधींच्या यात्रेला जो जण समुदाय पाहतोय ते बघून कळतंय ही यात्रा फक्त राहुल गांधींची नसून तर या देशाची यात्रा झाली. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने गेल्या ८-९ वर्षात या देशाला बरबाद केलं आणि त्याच्यामुळं शेतकरी असेल, बेरोजगार असेल, छोटा व्यापारी , तरुण असेल हे सर्वे लोक राहुल गांधींन सोबत यात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधींन सोबत ही जण आंदोलान निर्माण झाला असून शेगावमध्ये उद्या  जी सभा होणार त्याचा रिपोर्ट सुद्धा सरकारमध्ये बसलेल्या लोकांना गेला असेल आणि म्हणून शेगावमध्येजी सभा होणार आहे. त्यांनतर महाराष्ट्रात तर परिवर्तन होणारच आहे परंतु संपूर्ण देशात या मध्य भारतामधून, संत नगरीमधून परिवर्तनाची लहर पुढे जाणार आहे.

Exit mobile version