HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंशी मतभेद नव्हतेचं ! शरद पवारांचा दावा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खास मुलाखत घेतली. यात त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. सध्या कोरोनाच्या संकट काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉकडाऊनवरून कुरबुरी सुरू होत्या. याबाबतचं त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले.

प्रश्न- गेले काही दिवस ज्या बातम्या येत आहेत की, लॉकडाऊनसंदर्भात आपली भूमिका आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे, मतभेद आहेत.

उत्तर – अजिबात नाही. कसले मतभेद? मतभेद कशाकरता? या संपूर्ण काळात माझा मुख्यमंत्र्यांशी उत्तम संवाद होता आणि आजही आहे.

प्रश्न- पण लॉकडाऊन शिथिल करावा अशी आपली भूमिका होती आणि त्या संदर्भात मतभेद होते असं प्रसिध्दी माध्यमात आलं आहे..

उत्तर- प्रसिध्दी माध्यमात काय आलं आहे ते येऊद्या. एक लक्षात घेतलं पाहिजे. वृत्तपत्राच्या काही समस्या असतात. जसं लॉकडाऊनमुळे आम्हाला घराबाहेर पडता येत नाही, आमची बरीच कामे करता येत नाही, त्याचे परिणाम अनेक घटकांवर झाले आहेत. तसे वृत्तपत्रांवर देखील झाले आहेत. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे हे उद्योग असतात, कार्यक्रम असतात ते कमी झाले.

त्यामुळे जागा भरण्यासंबधीची जबाबदारी त्यांना टाळता येत नाही. मग यांच्यात आणि त्यांच्यात नाराजी असल्याच्या बातम्या दिल्या जातात. दोन तीन दिवस मी वाचतोय आमच्यात म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद वाढत आहेत. त्यात यकिंचीत देखील सत्य नाही आहे. पण बातम्या येतायत, येऊ द्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत, पवारांचा भाजपला टोला

News Desk

“महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची”, मेट्रो कारशेडवरुन शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna