HW News Marathi
महाराष्ट्र

‘…यामुळे २०२४ मध्ये मोदींची हकालपट्टी होईल’, लालू प्रसाद यादवांचा दावा!

नवी दिल्ली। राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींबद्दल एक मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार असल्याचं मत लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलं आहे.देशातील जनता वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे कंटाळली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ मध्ये हकालपट्टी होईल असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. शुक्रवारी लालूप्रसाद यादव यांनी द क्विंटला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.

त्यामुळे याचे उत्तर आपण नव्हे तर काँग्रेस पक्ष देईल

दरम्यान पुढचा पंतप्रधान कोण असेल, असे विचारले असता लालू यांनी यावर नंतर चर्चा केली जाईल असे म्हटले आहे. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, एक व्यक्ती काय बोलते किंवा विचार करते याने फरक पडत नाही. त्यामुळे याचे उत्तर आपण नव्हे तर काँग्रेस पक्ष देईल.असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मोदी सरकारने पेगॅसस स्पायवेअर खरेदी केल्याची शक्यता

पेगॅसस हेरगिरीप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आता थेट मोदी सरकारवर निशाना साधला आहे. पेगॅसस स्पायवेअर हे सरकारनेच खरेदी केल्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.इस्रायलची एनएसओ ही संस्था खासगी आस्थापनांना स्पायवेअरची विक्री करीत नाही असे राजदूतांनी म्हटले आहे. याचाच अर्थ हे स्पायवेअर सरकारने खरेदी केले असा होतो असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याप्रकरणी चौकशी करण्याकरिता स्वतंत्र तज्ज्ञ समिती नेमलीआहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणावरही पाळत ठेवण्याचा मुक्त परवाना सरकारला नाही. या स्पायवेअरच्या प्रकरणात आपण मूक प्रेक्षक बनू शकत नाही असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू’, प्रविण गायकवाडांना मनसेचा थेट इशारा!

News Desk

महाविकासआघाडीत पुन्हा बिघाडी? कॉंग्रसे नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

News Desk

RSS चे सरसंघचालकांना कोरोना झाल्यावर अमोल मिटकरी म्हणतात,”आता भिडे गुरुजींना विचारा”

News Desk