HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“कंगना राणावत से दूर रहो”, गृहमंत्र्यांना धमकीचे फोन सुरूच…

मुंबई | कंगना राणावत प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सतत धमकीचे फोन येत आहे. अनिल देशमुख यांना २ दिवसांपूर्वी देखील धमकीचा फोन आला होता. हिमाचल प्रदेशमधून हे धमकीचे फोन येत आहे. कंगना राणावत प्रकरणात रोज नव्या गोष्टी समोर येत आहे. आज कंगना मुंबईत येणार आहे. त्यामुळे तिचे स्वागत कसे होणार आणि कोणता नवा वाद निर्माण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

‘कंगना राणावत से दूर रहो, ये बात समझ लो, तुमने गलत किया है, अभी भी संभल जाओ नही तो…’ अशा धमकीचे सतत फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांना येत आहे. काल (८ सप्टेंबर) दिवसभरात अनिल देशमुख यांना ७ धमकीचे फोन आल्याची माहिती मिळाली आहे. आज (९ सप्टेंबर) पहाटेही २ धमकीचे फोन येऊन गेले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून अनिल देशमुख यांना फोनवरुन धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे.

 

कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांचा अवमान केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. अभिनेत्री कंगना बेजबाबदार विधानातून महाराष्ट्र,मुंबई व मुंबई पोलिसांचा अवमान करत असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. अशा महाराष्ट्राचा जर कोणी अवमान केला तर राज्यातील जनता कधीही सहन करणार नाही, असं अनिल देशमुख यावेळी बोलले. तसेच, तिची ड्रग्स चाचणी करणार असेही ते म्हणाले आहेत.

Related posts

‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवरील जीवघेणा हल्ला, २६/११ची आठवण करून देतो !

News Desk

पुण्यातील कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये १० ते १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा !

News Desk

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढला लॉकडाऊन

News Desk