Site icon HW News Marathi

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget session) आजचा दहावा दिवस आहे. अर्थसंकल्पीय अदिवशेन सुरु झाल्यापासून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व आमदारांनी शिंदे सरकार विरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी करत आहे. विरोधक हे वेगवेगळ्या मुद्यांवर सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. विरोधकांनी आज (14 मार्च) राज्यातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांवर केलेल्यावर असंवेदनशील वक्तव्यावरून विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते.

 

असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा… गद्दार सत्तार हाय हाय… शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो… किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… पन्नास खोके एकदम ओके… बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला… यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दहावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Exit mobile version