HW News Marathi
Covid-19

#MahaVaccination : महाराष्ट्राने पार केला कोरोना लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा

मुंबई। महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात आला आहे. राज्याने काल(९ नोव्हेंबर) आतापर्यंत १० कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचा टप्पा ओलांडून एक नवीन विक्रम रचला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

“महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो. ” असं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यातील कोरोना डोसची आकडेवारी

राज्यात आतापर्यंत एकूण ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ नागरिकांचं पहिला डोस देण्यात झाला असून ३ कोटी २० लाख ७४ हजार ५०४ नागरिकांचं कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. यात मुंबईत सर्वाधिक करोनाचे डोस झाले आहे. मुंबईत १ कोटी ४९ लाख ९२ हजार ८२५ डोस तर पुण्यात १ कोटी २२ लाख ३३ हजार ३४० डोस दिले गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींपाठोपाठ २ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही घेतली कोरोना लस

News Desk

राज्यात आज ८२४० नवे रुग्ण आढळेल, तर ५४६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk

पंतप्रधान मोदी आज ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार

News Desk