Site icon HW News Marathi

महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर

मुंबई | महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) जगभरातील पर्यटन येत असतात. या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा देण्याचा पुरवण्यासाठी पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर  करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्यांदा सातारा दौरा केला. ही बैठक महाबळेश्वर येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडली.  या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

या जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीतून दर्जेदार कामे करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. साताऱ्या जिल्ह्यात दळणवणांच्या सोयी होण्यासाठी रस्यांचे चाळे उभा करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आणि महाबळेश्वर येथे वाहन पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न सोडण्यासाठी एसटी डेपो आणि रे गार्डन येथे वाहनतळ उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असे स्पष्टीकरण ही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच महाबळेश्वर सोबतच जिल्ह्यात इतर ठिकाणी पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी विभागीय अधिकारी दर्जाचे पद साताऱ्यात निर्माण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठीही विभागीय अधिकारी दर्जाचे पद
निर्माण करण्यात येईल असेही स्पष्ट केले.

राज्यातील पुस्तकाचे गाव भिलार हे ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. या दर्जा बदलून ते ‘ब’ दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. उन्हाळ्यामध्ये तापोळा परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.अशा ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी कसे मिळेल याचेही सर्वेक्षण करण्यात यावे. प्रतापगड संवर्धनाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, त्यासाठी नक्की निधी दिला जाईल असेही त्याने नमूद केले. सुरुर वाई ते पोलादपूर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, रस्ते विकास, रोजगार सुविधांसह जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

Exit mobile version