HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन महामंडळाचा धक्कादायक निर्णय

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप गेल्या अनेक दिवसांपासून पुकारलेला आहे. या संपाचे नेतृत्व मुंबईतील आझाद मैदानात भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात केलं जात होतं. मात्र आता या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे गेल आहे. राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने 41 टक्क्यांची पगारवाढ दिल्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटीचं विलिनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र आता सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.

काही कर्मचाऱ्यांनी नोटीसकडे दुर्लक्ष केलं

एसटी कर्मचाऱ्यांचा आजचा संपाचा 26वा दिवस आहे. जवळपास महिनाभर आ नंतर देखील कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघालेला नाहीये, म्हणूनच हे कर्मचारी आजही त्यांच्या त्याच मागण्यांवर ठाम आहेत. एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता धक्कादायक बातमी आहे. पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ बडतर्फीची नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे.निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी महामंडळाने 14 दिवसाची मुदत दिली होती. या मुदतीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. तर काही कर्मचाऱ्यांनी या नोटीसकडे दुर्लक्ष केलं आहे .

कर्मचाऱ्यांना आता हा मोठा धक्का

या सर्व कर्मचाऱ्यांचे बाबतीत पुढील कारवाई म्हणून महामंडळ त्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं नाही आणि दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार आता बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता हा मोठा धक्का मानला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातोश्रीबाहेरून ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याला अखेर पोलिसांनी सोडले

News Desk

इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा…नितेश राणेंचा वार 

News Desk

नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंना स्फोटक पत्र!

News Desk