HW News Marathi
क्राइम

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, वांद्रे पूर्वच्या कार्यालयावर तोडक कारवाईचे लोकायुक्तांचे आदेश

मुंबई | मविआ सरकारमधील परिवहन मंत्री आणि ऊद्धव ठाकरे यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट तोडल्या नंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा अनिल परब यांच्या बांद्रातील ऑफिसकडे वळवलाय. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 ऑक्टोबरला म्हाडाकडून कारवाई होणार असल्याचा दावा केलाय. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिलेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी अनिल परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई हणार असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय.

सरकारच्या आदेशाप्रमाणे या कार्यालयावर तोडक कारवाई होईल…

काही दिवसांपूर्वीही किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत जागेवर भेट देत तिथे मोठा गदारोळ घातला होता. ती दृष्य सगळ्यांनीच पाहिली होती. आत्ता गंमत पाहा, अनिल परब यांनी हे कार्यालय त्यांच्या नावे नसल्याचे म्हाडा अधिकर्यांना सांगितले आहे. त्यानुसार म्हाडा अधिकार्यांनी अनोळखी व्यक्तीच्या नावे ही नोटीस पाठवल्याची सुत्रांकडून माहीती मिळतेय. उच्च न्यायालयाच्याआदेशानुसार राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांवर 30 सप्टेंबर पर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार म्हाडा आता केवळ नोटीस बजावत असून सरकारच्या आदेशाप्रमाणे या कार्यालयावर तोडक कारवाई होईल, असं बोललं जातं आहे. त्यामुळे आत्ता नेमकी कारवाई काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

छगन भुजबळ या मंत्रिमहोदयांना एवढेच सांगायचे की उड्या नका मारू 120 कोटी रुपये रोख मधून दिले गेले आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते तर कुठल्या नवनाथ घोटाळाचे होते का ते सांगा ? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते आणि आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे. मी म्हणालो ना चार दिन की चांदनी तिचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या, गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते करत असतील, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जन्मदात्या आईनेच 21 दिवसाच्या मुलीची केली हत्या

News Desk

खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट…

News Desk

विरोध असताना मुलीचे लग्न लावले, सहा महिन्यांनी केला जावयचा खून

News Desk