HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”, तुषार भोसलेंची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई | राज्य सरकारने काल(२ ऑगस्ट) नवीन नियमावली जाहीर केली आहे. दुकानांना यामध्ये सूट देण्यात आली आहे, मात्र लोकल आणि मंदिरांना अजूनही सुरु करण्याची परवानगी दिली गेलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आले आहेत. त्यावरून आता भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं अजूनही बंदच आहेत. या वरून आता ठाकरे सरकार विरोधकांच्या कचाट्यात सापडले आहेत.’ मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. राज्यात आता सर्व काही सुरू झालं आहे. राज्याने निर्बंधामध्ये शिथीलता दिली असताना ठाकरे सरकारने मंदिरं उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. नियमानुसार आता सर्वकाही सुरू झालंय. त्यामुळे आता ज्यांनी लस घेतली आहे, त्या भाविकांसाठी मंदिरे सुरू करावीत’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, असं तुषार भोसले यांनी म्हटलंय. मंदिरं सुरू ठेवायला सरकारला काय अडचण आहे?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने जारी केलेल्या नियमावलीवर आक्षेप घेत त्यांनी मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.

नवी नियमावली काय असेल

1. सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

2. सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी

3. सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

4. जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.

5. कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी.

6. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी

7. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद.

8. सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार.

9. शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार.

10. सर्व रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेनं दुपारी ४ पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.

11. रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.

12. वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी.

13. राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.

 

Related posts

MPSC परीक्षेतून होणारं संघीकरण आणि भाजपचा प्रचार रोखा,यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

राज्यात कोरोना रुग्णसंख्या १० लाखांच्या पुढे

News Desk

अन्वय नाईक प्रकरण आहे तरी काय?

News Desk