HW News Marathi
महाराष्ट्र

जुगाराच्या वादातून दोघांवर हल्ला

मुंबई – जुगार खेळतांना झालेल्या वादाचा राग मनात ठेवून दहा जणांनी दोघांवर तीक्ष्ण हत्यारानं हल्ला केल्याची घटना घडलीय. कांदिवलीमधील ठाकूर्ली रोड इथं काल रात्री ही घटना घडलीय. पाच आऱोपींना अटक केली असून पाच जण अजूनही फरार आहेत.

आरोपी आणि जखमी असे बारा जण मिळून जुगार खेळायचे. त्यांच्या जुगाराच्या खेळातून वाद झाला होता. तो वाद यापैकी दहा जणांनी डोक्यात ठेवून प्रमोद तडेकर व केतन तडेकर यांना बांबू, चाकू आणि सिमेंटच्या लादीनं जबर मारहाण केली. मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी पाच जणांना कांदिवली पोलिसांनी अटक केली असून इतर पाच आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटीचे कार्पेट; राऊतांचा मुनगंटीवारवर आरोप

Aprna

भिमाकोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या – आठवले

swarit

“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल”, राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk