HW News Marathi
महाराष्ट्र

‘साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही’!, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई | मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे. साकीनाका येथील बलात्काराची घटना अत्यंत दुर्देवी असून या घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल. तसेच पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. शासन त्यांच्या संगोपनाची पुरेपूर काळजी घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अनुसूचित जाती आयोगाच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही

साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार झाल्यानंतर तिचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग मुंबईत आला होता. या आयोगाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावून घेतले आणि त्यांच्याशी चर्चा केली. सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदन, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मिलिंद भारंबे आदिंची उपस्थिती होती.

पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. या परिवारास महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन पोषणाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले आहे.

गुन्हासाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलं आहे

पीडित महिला ही विशिष्ट समाजाची असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे आणि त्याने गुन्हाच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. घटनास्थळावर गुन्हा कसा घडला या घटनाक्रमातून सर्व पुरावे मिळाले आहेत. आरोपीकडून गुन्हासाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलं आहे,” असे हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी शासकीय योजना जाहीर केली आली आहे. मुख्यमंत्री निधीतून आणि शासकीय योजनांमधून पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे,” असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाझे प्रकरणाची नाळ शिवसेनेशी? कॉंग्रेस नेत्याने उपस्थित केला सवाल!

News Desk

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राम शिंदेंनी घेतली उदयनराजेंची भेट

News Desk

गुणरत्न सदावर्तेंनी ST कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे न्यायालयात केले मान्य, कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

Aprna