HW News Marathi
महाराष्ट्र

काही साप चावतात, तर काही चावत नाहीत त्यांना ठेचायचं असतं, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका

शिवनेरी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी आमच्या धमण्यांमध्ये, रक्तांमध्ये शिवाजी महाराज आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही टीका केली आहे.

शिवनेरीवर शिवाजी महाजांना मानाचा मुजरा केल्यानंतर झालेल्या छोटेखानी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

दुसरे वर्ष आहे शिवनेरीवर येण्याचे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

मास्क ही आपली ढाल

छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. छत्रपती दैवत का आहे. तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती.कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. पण आता कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असं सांगतानाच साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, शिवसेना मंत्र्याचं विधान

News Desk

सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच -अजितदादा पवार

swarit

हेलिकॉप्टरमुळे लोकसभेचं तिकीट गेलं! सुजय विखेंच्या या आरोपात तथ्य नाही,राष्ट्रवादीने दिले उत्तर

News Desk