HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर जाणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी म्हणजेच १९ ऑक्टोबरला एका दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सांगवी, अक्कलकोट येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्री सांगवी खूर्द येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अक्कलकोट शहर हत्ती तलावाची पाहणी, उमरेगेमधील आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करुन मुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. ते बाहेर पडले की फक्त त्यांना कोरोना होतो अशा टीका विरोधी पक्षाकडून केल्या जात होत्या. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी पाणी फेरले आहे. आणि ते पाहणी करण्यासाठी सोमवारी रवाना होणार आहेत.

Related posts

रामनाथ मोतें, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

News Desk

MarathaReservation | राज्यांनी वेळ वाढवून मागितल्यावर कोर्टानं १ आठवड्याचा दिला वेळ

News Desk

परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला, अनिल देशमुखांचे ट्विट

News Desk