HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी वाहिली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईच्या स्मृतीस श्रद्धांजली

मुंबई | कोरोनाच्या संकट काळात राज्यातील स्थिती एकीकडे आणि आईची तब्येत या सर्व बाबी अगदी नीट सांभाळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (७४) यांचे काल (१ ऑगस्ट) निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. ‘सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबियांचे सांत्वन करतांना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. त्यांचे सुपुत्र आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली.माझे कुटुंबीय व पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!’, असे शरद पवार यांनी ट्विट केले.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजेश टोपे यांच्या आईच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. ‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात असताना देखील राजेश टोपे जी यांनी कोरोनाविरुद्ध लढून महाराष्ट्राची काळजी घेतली. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना’, असे उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संत तुकोबांच्या पालखीचे दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान

News Desk

एल्गार परिषद प्रकरण : एनआयएकडे तपास सुपूर्त करण्याबाबत आज होणार सुनावणी

swarit

कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

Aprna