HW News Marathi
महाराष्ट्र

“मी तुम्हाला शब्द देतो…,” उद्धव ठाकरे त्या महिलेशी नेमकं काय बोले?

ठाणे | ठाणे जिल्ह्यात घडलेला भयंकर प्रकारचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पीडित महिलेशी संवाद साधला आहे. पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांच्या धाडसाचं कौतुक करतानाच त्यांना एक आश्वासन दिलं आहे.

तुम्ही चिंता करु नका, लवकर बरे व्हा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडित महिला कल्पिता पिंपळे यांच्याशी संवाद साधला आहे. . कल्पिता यांनी फोन घेताच मुख्यमंत्र्यांनी, “तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की…तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात, पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका. लवकर बरे व्हा,” असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण या हल्ल्यानंतर भेट घेण्यासाठी का आलो नाही यासंदर्भातही कल्पिता यांना माहिती दिली. “मला रोज रिपोर्ट येत असतो. उगाच त्यात राजकारण नको म्हणून फोन करणं, भेटणं टाळलं. आरोपींना कडक शिक्षा होणार. त्याची काळजी तुम्ही करु नका,” असं मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांना सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण?

ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी (३० ऑगस्ट) कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले आहेत.

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या एका बोटाची शस्त्रक्रिया मंगळवारी पहाटे ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहाय्यक आयुक्तांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली. आता बरं होताच पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करणार असं सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने थकवले पाण्याचे २३३ कोटींच बिल

News Desk

“मी नगरसेवक झाल्यानंतर बाबरी पाडायला गेलो “, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर

Aprna

पंतप्रधान संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, मुख्यमंत्र्याचा फडणवीसांवर पलटवार

News Desk