HW News Marathi
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे देतायत शिस्तीचे धडे

नागपूर | नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. आणि आता त्यांनी याच शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. नागपूर शहरात सुव्यवस्था यावी, तसेच अनेक चुकीच्या बाबी मार्गावर याव्यात यासाठी मुंढेंनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, या कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्यासाठी तुकाराम मुंढेंनी एक परिपत्रकच काढले आहे. या परिपत्रकात मंजूर झालेल्या सुट्ट्यांचेच वेतन कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असेही लिहिले आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच तुकाराम मुंढेंनी कामात अनियमितता आढळल्याने लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देत दणका दिला होता. आयएएस तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीची ख्याती इतकी आहे की, त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली आहे हे समजले असतानाच ते रुजू होण्यापूर्वीच नागपूर मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी वेळेत कार्यालयात यायला लागले. पहिल्याच बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांचा क्लास घेत काम न करणाऱ्यांना घरी जावे लागेल, असा इशाराही दिला होता.

 

परिपत्रकातील काही ठळक बाबी

१. तीन दिवसीय लेटमार्क झाल्यास एका दिवसाची सुट्टी कमी करणार

२. मंजुरीशिवाय सुट्टी घेतल्यास पगार कमी करण्यात येणार

३. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर बंधनकारक

४. कार्यालयीतील भिंतींवर कुठलाही कागद, परिपत्रक दिसल्यास कारवाई

५. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्यास प्रशासकीय कार्यवाही

६. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांकडेच आवश्‍यक बाबींची मागणी करावी लागेल

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही, चंद्रकांत पाटलांची स्पष्टोक्ती

News Desk

लखीमपूर खेरीप्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Aprna

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा! – मुख्यमंत्री

Aprna