HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल .

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे मालमत्ता विभागातील कर्मचारी दयाराम डोभाळे यांनी फिनायल प्राशान करुन आत्महत्येचा प्रयत्न महापालिका मुख्यालयात केला असुन त्यांच्या तक्रारीवरुन मध्यवर्ती पोलिस ठाण्यात महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त विकास तोटावार यांच्या आदेशाने ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मागच्या वर्षी 2017 मध्ये पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर रिपाई नगरसेवक भगवान भालेराव यांच्या तक्रारीवरुन अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर 2018 च्या सुरवातीलाच भदाने याच्यावरही अट्रोसिटीच्या गुन्हाची नोंद झाली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागात दयाराम डोभाळे हे कर निरीक्षक म्हणुन काम करत असुन त्या विभागात कर संकलन व निर्धारक म्हणुन असलेले यूवराज भदाणे यांनी डोभाळे यांना मानसिक त्रास दिला असुन २९/८/२०१७ रोजी भदाणे यांनी दयाराम डोभाळे यांना चांभार या जातीवरुन काही लोका समक्ष शिव्या दिल्या होत्या . त्याची तक्रार डोभाळे यांनी पोलिस ठाण्यात केली होती . परंतु पोलिसांनी तेव्हा कोणती ही दखल घेतली नव्हती .
त्यामुळे भदाणे यांचे मनोबल वाढले . आणि तो त्रास देतच राहिला . त्यामुळे २ जानेवारी रोजी दयाराम डोभाळे यांनी महापालिका मुख्यालयातच फिनायल प्राशान करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . दरम्यान त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता त्यानी युवराज भदाणे यांच्या विरुध्द मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार केली असुन त्यांनी तक्रारीत भदाणे यांनी जाती वाचक बोलल्याचे नमुद केले असल्याने उल्हासनगर चे सहाय्यक पोलिस उपायुक्त विकास तोटावार यांच्या आदेशाने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गु . र . न . २/२०१८ कलम ५०६ सह अनुसूचित जाती जमाती . अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम २०१६ चे कलम ३ (१) (आर ) (एस) (यु) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन अद्याप भदाणे यांना अटक झाले नाही .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात पहिल्यांदाच जेल पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रात येणार, येरवडा जेलमधुन होणार सुरुवात – अनिल देशमुख

News Desk

महाराष्ट्र NCC ग्रूप कमांडर्स वार्षिक परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Aprna

….हे तर देसाईंचे मत | मुख्यमंत्री

News Desk