HW News Marathi
महाराष्ट्र

लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन, गडकरींचा अधिकाऱ्यांना इशारा

नागपूर | ‘आठ दिवसात समस्या साेडवा अन्यथा लाेकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगिन,’ अशी धमकी वजा इशारा मी परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे नितीन गडकरी यांनी त्या कार्यक्रमात सांगितले. एमएसएमई सेक्टरमध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना अशी धमकी दिल्याचा संदर्भ गडकरींनी परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. तसेच आपण लालफितीच्या कारभराच्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

लालफितीच्या कारभरावर नाराजी व्यक्त करत गडकरी म्हणाले की, “आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. त्यांची प्रकरणे माझ्यासमोर उघड होतात. मी त्यांना सांगू इच्छीताे की तुम्ही सरकारी नाेकर आहात. मी लोकांमधून निवडून आलो आहे. मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल तर मी तुम्हाला एक चोर म्हणेन. तसेच या अधिवेशनात सहभागी झालेल्या उद्याजकांना कुठलीही भिंती मनात न बाळगता व्यवसाय करा अधिकारी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत असेही त्यांनी सागितले.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट !

News Desk

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी ‘जेलभरो’ आंदोलन!

News Desk

सरकार केव्हा पडेल कळणारही नाही; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर!

News Desk