HW News Marathi
क्राइम

बारामती हादरलं ! अजित पवारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांवर गोळीबार

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर आज (३१ मे) संध्याकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात तावरे यांच्या पोटात गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तावरे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येत असून पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली आहे. संपूर्ण बारामती तालुका या घटनेमुळे हादरला आहे. रविराज तावरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, तसेच अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांपैकी एक असून ते जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. माळेगावातील तावरे यांचे मोठे नाव असल्याचे म्हटले जाते.

नेमके प्रकरण काय ?

बारामती येथील जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे सायंकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे. तावरे हे त्यांची पत्नी समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येत आहे. मोठ्या संख्येने त्यांचे समर्थकांनी बारामती रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

News Desk

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

News Desk

बेदम मारहाणीत चोराचा मृत्यू, एक जण जखमी, जळगाव जिल्ह्यातील घटना

News Desk