HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

मुंबई | अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने आधी त्यांना व्हेरिफिकेशनसाठी डायरेक्ट मेसेज पाठवला आणि त्यानंतर ऊर्मिला यांचे अकाऊंट हॅक केले. याप्रकरणी ऊर्मिला यांनी आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांचीही त्यांनी भेट घेतली. या घटनेनंतर तरुणी आणि महिलांनी सायबर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आता ऊर्मिला यांनी केले आहे.

 

 

ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती मातोंडकर यांनी स्वतः यांची ट्विट करून दिली आहे. याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामकडेही तक्रार नोंदवली आहे. पडताळणी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगण्यात आल्या आणि नंतर अकाऊंट हॅक झाले, याबाबत आश्चर्यही त्यांनी व्यक्त केले आहे.

ऊर्मिला मातोंडकर या मागील काही वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. सुरूवातीला काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या राजकारणापासून दूर राहिल्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत नव्याने राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत,समोरून वार करतात’, आमदार शशिकांत शिंदे भडकले

News Desk

अमोल कोल्हेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’

News Desk

निर्बूद्ध नागरिकंचा मोर्चा

News Desk