HW News Marathi
महाराष्ट्र

वर्षा राऊतांनी ते ५५ लाख परत केले, पुन्हा EDचे समन्स येणार

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी पुन्हा एकदा समन्स पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या ५५ लाख रुपयांच्या व्यवहारप्रकरणात वर्षा राऊत यांना ED ने नोटीस पाठवली होती, ते ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांनी आता परत केले आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले. त्यामुळेच त्या ईडीच्या रडारवर आहेत.

हा पैसा गुन्ह्यातील असल्याने वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं होतं. आता वर्षा राऊत यांनी हे पैसे परत केले आहेत. पैसे परत केले तरी गुन्ह्यातील पैसे घेतले असल्याने त्यांच्याबाबत असलेले आरोप संपत नसल्याचं ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ही’ शिवसेनेची मजबुरी आहे काय ?, प्रवीण दरेकरांचा सवाल 

News Desk

माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय, त्या व्यथा मी जाणतो – धनंजय मुंडे भावूक

News Desk

कोरोना संकटातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक! – नाना पटोले

News Desk