HW News Marathi
महाराष्ट्र

MNS वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले, तर मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मुंबई | मनसेचे वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवले आहे. पुण्यात मनसेला मोठा झटका ४ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी वसंत मोरेंनी शिवसेनेत सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. परंतु, वसंत मोरे हे सोमवारी (११ एप्रिल) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार असून या भेटीनंतर पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना केली आहे. यामुळे आता वसंत मोरे यांच्या राज ठाकरेंच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 मनसेच्या पदावरून वसंत मोरेंनी हटवल्याने त्यांच्या प्रभागातील मुस्लिम नागरिक पक्षावर नाराज असून या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या प्रभागातील नागरिक एकत्र आले आहे. लोक प्रतिनिधी म्हणून माझी अडचण होत आहे. २७ वर्षांनंतर पक्षातून हकालपट्टी हा शब्द मनाला लागणार असल्याचे वसंत मोरेंनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले.  युवासेनेला नवा सरसेनापती वरुण सरदेसाई आणि आदित्य शिरोडकरांचा वसंत मोरे यांना फोन आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आता वसंत मोरे हे त्यांच्या हातात शिवबंधन बाधणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वसंत मोरेंना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले

 राज ठाकरे यांच्या मदिशीवरील भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा, या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले. वसंत मोरे यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. यापूर्वी वसंत मोरेंनी पुण्याच्या उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले. तेव्हापासून पक्षश्रेष्ठी त्यांच्या भूमिकेवर नाराज असून वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देणार चर्चेला उधाण आले. वसंत मोरेंनी पक्षात राहून काम करणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… ‘लॉकडाऊ’मध्ये रामदास आठवले नेमका कोणता पदार्थ बनवला

News Desk

ग्रामसेवकावर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी

News Desk

कर्जत पंचायत निवडणुकीवरून पवार आणि शिंदे पुन्हा आमने-सामने!

News Desk