HW News Marathi
महाराष्ट्र

शासकीय इतमामात जवान बालाजी डुबुकवाड यांना दिला अखेरचा निरोप

नांदेड | कंधार तालुक्यातील बाचोटीचे भुमीपूत्र वीर जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या पार्थिवावर काल (२० डिसेंबर) बाचोटी येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा येथे भारत मातेच्या रक्षणासाठी वीर जवान नायक बालाजी यांना कर्तव्य बजावतांना शनिवारी १८ डिसेंबर रोजी वीर मरण आले. भारतीय सैन्यदलातील १०१ INF BN (TA) मराठा LI दलातील लान्सनायक म्हणून ते कर्तव्यावर होते.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बाचोटी येथे वीर जवान बालाजी यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक आदींनी यावेळी वीर जवान बालाजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंचक्रोशीतील नागरीक व युवकांची यावेळी उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kolhapur Elections: कोल्हापुरचं मैदान कोण मारणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Manasi Devkar

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची काळी दिवाळी

Gauri Tilekar

‘राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील’; गिरीश महाजनांना विश्वास!

News Desk