HW News Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर

मुंबई | विधानपरिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यात कोकण पदवीधवर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांना विजय मिळाला. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजयी हॅटट्रिक केली आहे. तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे विजयी झाले आहेत.

कोकण मतदार संघात निरंजन डावखरे विजयी

कोकण पदवीधर मतदारसंघात प्रतिष्ठेची लाढाई मानली जात होती. कारण कारण निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डावखरे यांना ३२ हजार ८३१ तर सेनेच्या संजय मोरे यांना २४ हजार ७०४ मते मिळवला. डावखरे यांनी ८१२७ मतांनी विजय मिळवला.

मुंबई शिक्षक मतदार संघात कपिल पाटील यांची हॅटट्रिक

मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजयी हॅटट्रिक केली आहे. भाजप पुरस्कृत उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव केला. कपिल पाटील यांना ४०५०, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांना १७३६ आणि भाजपचे अनिल देशमुख यांना ११२४ मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजप यांनी सर्व ताकद पणाला लावली होती.

मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास पोतनीस विजयी

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतानीस यांनी विजय मिळाला. भाजपच्या अमित कुमार मेहता यांचा पराभव केला. विलास पोतानीस यांना १९ हजार ४०३ मते मिळवली. तर भाजपचे अमित कुमार मेहता ७७९२ मते मिळाली. शिवसेनेच्या पोतानीस यांनी ११ हजार ६११ मतांनी भाजपचा पराभव केला.

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे विजयी झाले आहेत. दराडे यांना २४ हजार ३६९ मते, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असलेले उमेदवार संदीप बेडसे यांना १३ हजार ८३० मते मिळाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार’, शरद पवारांचं स्पष्टीकरण

News Desk

भुजबळ आणि वडेट्टीवार चेहरे चमकावायला आले होते,आरक्षणावर रावसाहेब दानवे यांची टीका!

News Desk

गुढीपाडवा निमित्ताने धनंजय मुंडेनी घेतले प्रभु वैद्यनाथाची दर्शन

Aprna