HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : अमित शहांच्या भाषणादरम्यान ‘पंकजा मुंडे सीएम’च्या घोषणा

बीड | दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील संत भगवान बाबा येथे आले होते. या दसऱ्या मेळाव्याचे मुख्य आकर्षण असलेल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आले होते. शहांचे भाषण सुरू असताना मेळाव्यासाठी आलेल्या जनसमुदायतून पंकजा मुंडे सीएम या घोषणा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, शहांच्या भाषणात कोणाचे लक्षच राहिले नाही.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवून संपूर्ण देश एक केला,’ असे म्हणत शहांनी मोदींचे कौतुक केले. मोदींनी केलेल कार्य हे घराघरापर्यंत पोहचवा, असे शहांनी उपस्थितींना सांगितले. “भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानबाबांच्या विचारांनी जगले. त्यांनी ऊसतोड कामगार, मजुरांचे प्रश्न मार्गी लावले. आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडेदेखील त्याच मार्गाने वाटचाल करत आहेत,” असे शहा म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून न्याय देण्याचा धाडसी निर्णय शहा यांनी घेतला, शहांच्या या निर्णयाचे कौतुक करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ३७० तोफांची सलामी आणि ३७० ध्वजांची सलामी दिली. औरंगाबाद विमानतळावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वगत करत हेलिकॉप्टरने सभास्थळी दाखल झाले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही ७ नगरेसवक उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवतोय” – नितेश  राणे

News Desk

१०० % उपस्थितीती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

News Desk

विनाकारण गाड्या घेऊन बाहेर पडणाऱ्या सांगलीकरांवर पोलिसांची कारवाई

swarit