HW News Marathi
राजकारण

ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव- वडेट्टीवार

औरंगाबाद | ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम भाजपकडून केला जात आहे, असा आरोप आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी औरंगाबादेत केला. राणा यांच्या विरोधात जात पडताळणी संदर्भात कारवाई झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आमदार रवी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली आणि ही कारवाई झाल्याचेही ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे आठवड्यात पूर्ण होतील. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत १३ हजार ६०० रुपये ही मदत राज्यशासन देणार आहे, असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले.

मतदार गृहित धरून केंद्राने काम करू नये

राज्यसरकारासोबत केंद्राने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे यावे असेही वडेट्टीवार म्हणाले. मागील तीन वर्षात जी मदत अपेक्षित होती ती मिळाली नाही. केंद्राकडे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला, पाहणी पथकासाठीही पाठपुरावा केला गेला. त्यात पुन्हा नव्याने ही परिस्थिती उद्धभवली. इथे ही मानसेच राहतात. मतदार गृहित धरून केंद्राने काम करू नये, असेही ते म्हणाले.

मंत्री वडेट्टीवार औरंगाबादमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ईडीने अडसुळांवरील केलेली कारवाई असो किंवा इतरांवर केलेली कारवाई हा सरकारला अस्थिर करण्याचा डाव आहे. सुपारी घेऊन काही जण काम करत आहेत. काय बोलतो आहोत, काय आरोप याचे भान त्यांना नाही. अशा बदलाच्या भावनेतून, सुडबुद्धीने राजकारण कधी नव्हते, ही पद्धत नव्याने राज्यात, देशात रुजते आहे. सुडबुद्धीने काम केले जात आहे हे जनता ओळखून आहे. अडसुळांवरील कारवाई ही अशाच प्रकारची आहे. अशा कारवाईमुळे महाविकास आघाडीला काही धोका नसून सरकार अधिक मजबूत होईल असे ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : तांत्रिक बिघाडाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम

News Desk

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले ? सुप्रिया सुळेंचा सवाल

Aprna