HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, विनायक राऊत यांनी केली मागणी

रत्नागिरी | शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना अडचणीत आणणारं मोठं विधान केलं आहे. ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली केली. राऊत यांच्या या मागणीमुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, असं सांगतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भाजपच्या शंभर नेत्यांची नावं ईडीला चौकशीसाठी देऊ शकतो, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. राणे सत्तेसाठी हपापले आहेत. त्यांनी मिटक्या मारत बसावे. त्यांना संपूर्ण आयुष्यात सत्तेतील सहभाग मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भाजप सत्तेसाठी हपापली आहे. त्यामुळे भाजप सैरभर झाली आहे. म्हणूनच भाजप नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. आज ना उद्या आपण सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसू असं भाजपला वाटत होतं. पण सुदैवाने तसं घडलं नाही. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून त्यांच्यात जबरदस्त समन्वय असल्याने भाजपचं सत्ता प्राप्तीचं स्वप्नं हवेत विरल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विस्टाडोम कोचच्या सुरूवातीसह पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत

Aprna

केवळ लक्ष्मीपुजनाच्या दिवशी फटाके वाजवण्यास पालिकेची परवानगी

News Desk

‘हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला’, माजी खासदार शिवाजीराव आढळरावांचा घणाघात!

News Desk